Wednesday 4 May 2011

येथे थुंकु नये!



आपण जागो जागी,म्हणजे, इमारतीमधील कोपरे, जिन्याचे कोपरे, रेल्वे स्टेशन वरील कोपरे अशा कानाकोपर्यातील जागेत काही महानुभाव थुंकुन घाण करतात। साधे सुधे थुंकणे नव्हे तर पान खानुन थुंकणे। त्या जागा इतक्या घाण झालेल्या असतात की तेथुन जाणे ही अवघड होऊन जाते। मला अशा लोकांची घृणा वाटते।
आपण बारकाईने विचार केला तर लक्षात येईल की एखादा कोपरा नुकताच रंगविला असेल व तेथे कोणीच घाण केलेली नसेल तर कोणी ही तेथे घाण करायला धजावत नाही, जोपर्यंत एखादी धुरंदर व्यक्ति तेथून जात नाही आणि थूंकत नाही तो पर्यंतच। त्या पहिल्या महाभागाने घाण केलि आणि ती दुसर्याच्या नजरेस पडली की ३-४ दिवसात त्या कोपर्याची वाट लागली म्हणून समजायच।

1 comment:

  1. Great post my friend, congratulations and greetings from:
    http://el-cine-que-viene.blogspot.com/

    ReplyDelete