Friday 15 April 2011

गरज नसतांना भोंगा का वाजवावा?


आपण आपली दुचाकी चालवित आहोत. समोर खुप वाहनं असल्याने हळुवारपणे वाहन चालवावे


लागत आहे आणि कोणीतरी मागुन जोरजोरात भोंगा म्हणजे होर्न वाजवित आहे. अशा वेळी मला फार चिड येते. त्याला समोर गर्दी आहे हे दिसत कसे नाही. हा आंधळा तर नाही न! नाही कारण तो एकटाच वाहन चालवित आहे. त्याने किती ही साईड मागायचा प्रयत्न केला तरी तो गर्दी तुन पुढे जाणे अशक्य आहे. याला उताविळ पणा म्हणायचा का?
अशा लोकांची मला खुप चिड येते.
तेव्हा राग घालविण्यासाठी मनातल्या-मनात त्याला दोन-चार शिव्या हाणाव्याशा वाटतात. पण तो आपला प्रांत नसल्याने राग गिळावा लागतो आणि शक्य झाल्यास बाजुला होऊन त्याला मार्ग द्यायचा प्रयत्न करतो.
(इमेज: गुगल)